जवळ जवळ दीड शतकापूर्वीच काळ. अनिष्ट रुढी परंपरांमध्ये जखडलेला आणि अंधारात चाचपडणारा समाज. स्त्रियांची स्थिती तर आणखीनच हलाखीची.शिक्षण नाही, घरातील कर्त्या पुरुषाच्या मर्जीवर चालणारं कठपुतळीसारखं जीवन. ज्ञानप्रकाशच काय नैसर्गिक सूर्यप्रकाश देखील काही जणींना अप्राप्य! या पार्श्वभूमीवर महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. विद्येच्या प्रांगणात मुलींचे पहिले पाऊल पडले…
'श्रम हीच पूजा हे तत्त्व पाळत जिवंत असेपर्यंत माझी काम करण्याची इच्छा आहे' असा निर्धार व्यक्त करणाऱ्या विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. असिमा चॅटर्जी यांचा परिचय या लेखातून करून घेऊ. डॉ. इंद्र नारायण मुखर्जी आणि कमलादेवी या बंगाली दांपत्याचे हे पहिले अपत्य. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर, १९१७ रोजी कलकत्ता (आता कोलकाता) येथे झाला. पेशाने डॉक्टर असले तरी मुखर्जी यांना वनस्पतीशास्त्रात, विशेषतः औषधी गुणधर्म अस…
समाजातील सर्वच स्तरांवर महिलांच्या कामाची विशेष दखल घेतली जात नाही. बऱ्याचदा त्याची नोंदही केली जात नाही. शिक्षण - संशोधन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जानकी अम्मल एडावलाथ कक्कट! खरं तर शिक्षण - संशोधन क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांवर सुवर्णाक्षरांनी हे नाव कोरायला हवं. पण आपण इतके करंटे की, संशोधनाच्या इतिहासातील मोजकीच पाने त्यांच्यासाठी खर्ची घातली. वनस्पतीशास्त्र - विश…
अलीकडेच एका मैत्रिणीशी विज्ञान - तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या महिला शास्त्रज्ञांविषयी चर्चा करत होते. अचानक ती म्हणाली, "भारतात कुठे अशा वैज्ञानिक आहेत? आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेल्या तर अगदीच कमी." तिच्या या प्रश्नावर मी अवाक झाले. कारण भारतीय महिला शास्त्रज्ञ म्हटलं की, इरावती कर्वे, कमला सोहोनी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यापुढे आपली यादी सरकत नाही. शांतीस्वरूप …
ज्या काळात भारतातील मुलींचे साक्षरतेचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी होते, उच्च शिक्षण, संशोधन क्षेत्रात येणाऱ्या मुलींचे प्रमाण अतिशय नगण्य होते, त्या काळात ज्यांनी पदार्थविज्ञान विषयात संशोधन करण्याचे स्वप्न फक्त पाहिलेच नाही, तर ते स्वप्न पूर्ण करून पुढे हवामान शास्त्रातील उपकरणांबाबत भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले त्या ज्येष्ठ व श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणजे अन्ना मणी. अन्…